एटीएम कार्डची अदलाबदल करून मंचरमध्ये सव्वा लाख लंपास

एटीएम कार्डची अदलाबदल करून 
मंचरमध्ये सव्वा लाख लंपास
Published on

मंचर, ता. ९ : भारतीय स्टेट बँकेच्या मंचर (ता. आंबेगाव) शाखेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले तांबडेमळा-मंचर एसटी आगाराचे चालक प्रकाश दत्तात्रेय थोरात (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांच्या एटीएम कार्डची अज्ञातांनी हातचलाखी करत अदलाबदल करून १ लाख १७ हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंचर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. ८) घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी थोरात यांनी स्टेट बँकेच्या मंचर येथील एटीएममधून नऊ हजार रुपये काढून पाकिटात ठेवले. त्यावेळी तेथे दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी थोरात यांच्याशी हिंदीत संवाद साधला, ‘‘तुम्ही पैसे काढले आहेत. त्याची पावती का काढली नाही?’’ असे विचारले. तेव्हा थोरात यांनी, मला पावतीची गरज नसल्याचे उत्तर दिले. मात्र त्या दोन व्यक्तींनी ‘‘तुम्ही थांबा, तुम्हाला पावती काढून देतो,’’ असे सांगितले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून थोरात यांनी पुन्हा एटीएम मशिनमध्ये कार्ड घालून पावती काढली. त्यावेळी एकाने थोरात यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. दुसऱ्याने कार्डची अदलाबदल केली. त्या वेळी थोरात यांना संशय आल्याने कार्ड पुन्हा मशिनमध्ये घालून पाहिले असता मशिनवर काहीच दिसले नाही. त्या वेळी ‘‘एटीएम लॉक झाले असेल, १५-२० मिनिटांत चालू होईल,’’ असे त्या दोघांनी सांगितले. थोरात यांची मुलगी आजारी असून, पुणे येथे उपचार घेत आहे. त्यामुळे थोरात ताबडतोब पुण्याला निघून गेले. पुण्याहून परत आल्यानंतर थोरात पुन्हा एटीएममध्ये गेले. त्यांना पुन्हा कार्ड ब्लॉक दिसले. संशय आल्याने त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता, ते कार्ड दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर निघाले. दरम्यान, चोरट्यांनी थोरात यांच्या कार्डद्वारे १ लाख १७ हजार रुपये काढून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com