

मंचर, ता. १० : आंबेगाव तालुक्यात चार हजारांहून अधिक दिव्यांग आहेत, पण त्यांना डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे अनुदान मिळालेले नाही. परिणामी दिव्यांग बांधव हवालदिल झाले आहेत.
‘‘दिव्यांगांची ३०० प्रकरणे जानेवारी २०२४ पासून मंजूर आहेत. पण अनुदानापासून वंचित आहेत,’’ असे समर्थ सेवा दिव्यांग संस्था आंबेगाव तालुक्याचे उपाध्यक्ष समीर टाव्हरे यांनी सांगितले.
‘‘दिव्यांगांच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्यासाठी शासनाची डीबीटी प्रणाली आहे. परंतु अनेक दिव्यांग बांधवांचे आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने त्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागतात. अनेक जण ७० ते ९० टक्के दिव्यांग आहेत. त्यांना बँकेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे बँक लिंक करण्याचे काम लांबणीवर पडत आहे,’’ असे भाऊसाहेब वाळूंज यांनी सांगितले.
‘‘महसूल व पंचायत समिती कार्यालयाने पुढाकार घेऊन आधार कार्ड डीबीटी प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी गावोगावी जाऊन मोहीम राबवावी,’’ अशी मागणी ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली.
ज्यांचे आधार कार्ड लिंक आहे, पण बँकेत पैसे जमा झाले नाहीत., अशा दिव्यांग बांधवांनी घोडेगाव येथील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाशी किंवा घोडेगाव येथील समर्थ दिव्यांग सेवा संस्था कार्यालयात संपर्क साधावा. त्यांना विनामूल्य मदत व सहकार्य केले जाईल.
- सुनील दरेकर, अध्यक्ष, समर्थ सेवा दिव्यांग संस्था, घोडेगाव.
घोडेगाव तहसीलदार कचेरीतून दिव्यांग बांधवांची डीबीटी प्रणाली कार्यान्वित केली जाते. त्यासाठी संजय गांधी योजना कार्यालयातून कामकाज केले जाते, पण हे कार्यालय कचेरीच्या पहिल्या मजल्यावर आहे. येथे लिफ्टची सोय नाही. त्यामुळे सोमवारी (ता. १०) १०० टक्के दिव्यांग असलेले मुन्ना इनामदार (मंचर) यांना दोन लोकांनी उचलून पहिल्या मजल्यावर नेले. सदर कार्यालय तळमजल्यावर घ्यावे. अन्यथा आंदोलन करावे लागेल.’’
-समीर टाव्हरे, उपाध्यक्ष, समर्थ सेवा दिव्यांग संस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.