मंचर बाजार समितीत कांद्याच्या भावात किंचित वाढ

मंचर बाजार समितीत कांद्याच्या भावात किंचित वाढ
Published on

मंचर, ता. १७ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (ता.१६) बारा हजार ५८९ कांदा पिशव्यांची आवक झाली. दहा किलो कांद्याला २०० रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात किंचित वाढ झाली आहे.

आंबेगाव, शिरूर तालुक्यात वसर हद्दीवर असलेल्या खेड तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या कांदा काढणीची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मंचर बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आलेल्या कांदा पिशव्यांचे वजन शेतकऱ्यांच्या समक्ष व लिलाव पद्धतीने आडते कांद्याची खरेदी करतात. २४ तासात कांदा उत्पादकांना पैसे देण्याची पद्धत आहे. त्यामुळे मंचर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणण्याचे शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
दरम्यान, मंचर येथे दर रविवारी मंगळवारी व गुरुवारी कांद्याचा मोठा बाजार भरतो. पुणे, मुंबई, हैदराबाद बंगलोर, सुरत भागातील व्यापारी येथे कांदा खरेदीसाठी येतात. गेल्या आठवड्यात चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोला १६० रुपये ते १८० रुपये बाजारभाव मिळाला होता. त्या तुलनेत बाजारभाव थोडी वाढ झाली आहे.

दहा किलो कांद्याचे बाजारभाव पुढीलप्रमाणे : सुपर लॉट एक नंबर गोळा कांदा १८० रुपये ते २०० रुपये, सुपर गोळे कांदे एक नंबर १५० रुपये ते १८० रुपये, सुपर मीडियम दोन नंबर कांदा १२० ते १५० रुपये, गोल्टी कांदा १०० ते १२० रुपये, बदला कांदा ५० रुपये ते १०० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com