मंचर शहरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या : घुले

मंचर शहरात नागरी सुविधा 
उपलब्ध करून द्या : घुले
Published on

मंचर, ता. २८ : मंचर शहराचा दिवसेंदिवस विस्तार व लोकसंख्या वाढत आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी नगरपंचायतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन व महिला-पुरुषांच्या स्वच्छतागृह संख्येत वाढ करावी, अशी मागणी सामाजिक क्षेत्रात काम करणारे आदेश बाळासाहेब घुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे केली आहे.

‘निघोटवाडी ग्रामपंचायत ही मंचर नगरपंचायतीत समाविष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंचर शहरात राहणाऱ्या नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, अशी मागणी नागरिकांनी आहे. शहरातून जाणारा जुना पुणे-नाशिक महामार्गालगत बंदिस्त गटार योजना, पथदिव्यांची दुरुस्ती, पार्किंग व्यवस्था, पोलिस चौकी इमारत, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी उद्यान, रस्ते दुरुस्ती, अतिक्रमणे हटवावीत, भूमिगत वीजवाहिन्या, अग्निशामक बंब, आदी सुविधा तसेच युवक व युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना प्राधान्याने राबवाव्यात, आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे केल्या. निवेदनाची प्रत जाधव यांच्याकडे दिली,’ असे आदेश घुले यांनी सांगितले.
शिष्टमंडळात अवधूत घुले, सिद्धेश बुदगे, संजय थोरात, तुषार घुले, अयाझ सुतार यांचा समावेश होता.

गोविंद जाधव म्हणाले, ‘‘मंचर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे स्वागत आहे. सूचित केलेली कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी व्यवस्थित नियोजन केले जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com