‘मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्र ऑनलाइन मिळावे’

‘मंचर उपजिल्हा रुग्णालयात
प्रमाणपत्र ऑनलाइन मिळावे’
Published on

मंचर, ता. १० : येथील उपजिल्हा रुग्णालयात विवाह नोंदणी, जन्ममृत्यू प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने मिळावे, अशी मागणी मंचर शहर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
याबाबत त्यांनी सांगितले की, मंचर ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी विवाह नोंदणी व जन्म-मृत्यू नोंदणी सुलभ होती. पण, ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. त्यामुळे याबाबतच्या नोंदी नागरिकांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात कराव्या लागतात. उपजिल्हा रुग्णालयातून मिळत असलेल्या ऑफलाईन प्रमाणपत्राचा उपयोग नागरिकांना पासपोर्ट, मतदानकार्ड, रेशनिंगकार्ड व पॅनकार्डसाठी सुविधा केंद्रात होत नाही. त्याचा मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयाने शासनस्तरावर प्रयत्न करावा.
याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील हडोळतीकर यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून उपजिल्हा रुग्णालयांना विवाह नोंदणी व जन्म-मृत्यू नोंदणी ऑनलाइन पद्धतीने दाखले देण्याबाबत कोणत्याही मार्गदर्शन सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. राज्य शासनाचे सॉफ्टवेअर अद्याप येथे प्राप्त नाही. बाणखेले यांनी केलेल्या मागणीनुसार वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com