मंचर शहरात बिबट्याचे दर्शन

मंचर शहरात बिबट्याचे दर्शन
Published on

मंचर, ता.१० : मंचर शहराच्या कार्यक्षेत्रात असलेल्या लोंढे मळा वस्तीजवळ गुरुवारी (ता. १०) सकाळी सव्वा दहा वाजता बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले. काही नागरिकांनी बिबट्या उसाच्या शेतातून केळीच्या बागेत जात असताना काढलेला व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे येथे असलेल्या प्राथमिक शाळेपासून ५० मीटर अंतरावर बिबट्याची जोडी होती. पण महावीर जयंतीची सुटी असल्याने शाळा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.
शेतकरी ऋषिकेश अरुण लोंढे ट्रॅक्टरद्वारे नांगरट करत होते. त्यांनी बिबट्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यांनी सांगितले की, ऊस तोडणी सुरू होती. शेजारच्या जमिनीत ट्रॅक्टर ने नांगरट सुरू होती. ऊस कामगार व ट्रॅक्टरच्या आवाजाने प्रथम एक बिबट्या तिथून पळत गेला. त्यानंतर दुसरा बिबट्या पाहून मी मोबाईल मध्ये शूट केले.
गेल्या दहा ते बारा दिवसापासून या भागात रात्री कुत्र्यांचा जोरदार भुंकण्याचा आवाज येत आहे. या भागातील नागरिकांना अलर्ट राहण्याविषयी सूचित केले आहे." नर आणि बिबट्या अशा दोघांचा इथे वावर आहे.
मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाने दोन्ही बिबटे जेरबंद करण्यासाठी ताबडतोब पिंजरे लावावेत, अशी मागणी धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम लोंढे यांनी केली आहे.

वन खात्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृतीचे काम केले जाईल. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला जाईल. शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. शाळेत मुलांसमवेत पालकांनी सकाळी व संध्याकाळी ये-जा करावी.
- विकास भोसले, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी

12970

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com