अवसरी खुर्दला यात्रा काळात डीजेला बंदी

अवसरी खुर्दला यात्रा काळात डीजेला बंदी
Published on

मंचर, ता. १८ : ‘‘अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव सोमवार (ता. २१) ते बुधवार (ता. २३) या कालावधीत होत आहे. यात्रा मिरवणुकी दरम्यान डी. जे. वापरावर बंदी घालण्याचा निर्णय यात्रा समिती व ग्रामस्थांनी घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन केल्यास संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.’’ असा इशारा अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव वायळ यांनी दिला.
डीजेच्या कर्कश आवाजाचा लहान मुले, गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. समोरासमोर डीजे आणि मिरवणूक आल्यानंतर अनेकदा भांडणाचे प्रसंग उद्भवतात. या सर्व होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून डीजे बंदीचा निर्णय घेतला आहे. सर्व ग्रामस्थांनी सदर निर्णयाचे पालन करावे. यात्रा मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या साह्याने शांततेत काढण्यात यावी.” असे आवाहन वायळ केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com