

मंचर, ता.२३ : आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यात शनिवार (ता. १७) ते गुरुवार (ता.२२) या कालावधीत जवळपास २५० हून अधिक विवाह झाले. पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः लग्न समारंभ, सत्यनारायण पूजा व जागरण गोंधळ यांसारख्या कार्यक्रमांवरही मोठा परिणाम झाला.
अनेक कुटुंबांचे विवाह मंगल कार्यालयात झाले. पण विवाहापूर्वी वराची व विवाहानंतर वरातीचे आयोजन करता आले नाही. सत्यनारायण पूजा घरात पण जागरण गोंधळ हे कार्यक्रम घरासमोरील अंगणात करण्याची परंपरा आहे. शुभकार्यामुळे अनेकांनी घरासमोर कापडी मंडप उभारले होते. जागरण व पूजेनिमित्त येणारे पाहुणे व मित्रपरिवारासाठी भोजन व्यवस्था केली होती. पण वारंवार येणाऱ्या वादळी पावसाने मंडप उडून गेले. विद्युत पुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी ध्वनीव्यवस्थाही कोलमडली. काही जणांना कार्यक्रम पुढे ढकलावे लागले. काही ठिकाणी पावसातच कार्यक्रम पार पाडावे लागले. पुरेशा प्रमाणात गर्दी न झाल्याने तयार केलेले अन्न मोठ्या प्रमाणात वाया गेले. विशेषतः वरपित्यांची धांदल उडाल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले.
दरम्यान, यापुढे लग्न, सत्यनारायण पूजा व जागरण गोंधळ आदी कार्यक्रमाच्या तारखा निश्चित करताना हवामान विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम प्राधान्याने करणे गरजचे आहे, असे मत अनेक वर व वधूपित्यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.