मंचराला वाटाण्याने खाल्ला ‘भाव’

मंचराला वाटाण्याने खाल्ला ‘भाव’

Published on

मंचर, ता.१६ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता.१५) दहा हजार ८२४ तरकारी पिशव्यांची आवक झाली. वाटाण्यास प्रतिकिलोला १२० रुपये उच्चांकी बाजारभाव मिळवला. फ्लॉवर मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे बाजारभावात लक्षणीय घट झाली. फ्लॉवरला प्रतिकिलोला पाच रुपये ते दहा रुपये बाजारभाव सरासरी मिळाला. बाजारभाव कोसळल्याने फ्लॉवर उत्पादक शेतकरी हळहळ व्यक्त करत आहे.

बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात म्हणाले, “बाजार समितीत आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर व पारनेर तालुक्यांतील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. इथल्या लिलाव प्रणालीतील पारदर्शकता व बाजारभावाची तत्काळ एस.एम.एस. माहिती सेवा ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.


शेतकऱ्यांना बाजारभाव, वजन व एकूण रक्कम याची मोबाईलवर तत्काळ माहिती दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजार समितीवरील विश्वास वाढला असून आवकही दिवसेंदिवस वाढते आहे.
- सचिन पानसरे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर (ता.आंबेगाव).

शेतीमालाचे नाव त्यांचे बाजारभाव (रुपयात) (१० किलो): वाटाणा : १००० – १,२००(२), कारले : २००-४८० (४१८), गवार : ५०० - एक हजार (५१८), घेवडा : ३००-८५० (४९), ढोबळीमिरची : ३०० -६५० (१९५), भेंडी : २५०-३५५ (२१४), फरशी : ३०० -७०० (३), फ्लॉवर : ५० -१००(पाच हजार १८१), भुईमुगशेंगा : ३००-५७०(२८५), कोबी : १००-१५० (२३७), वांगी : २००-४००(१७५), दुधीभोपळा : १५० -३३० (१११), पावटा : ९०० (५), बीट : १२०-३२०(४५६).

13431

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com