फरशी, गवारसह वालवडला मंचर बाजारात उच्चांकी भाव
मंचर, ता. २५ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २२) झालेल्या शेतीमालाच्या लिलावात १० हजार ८१७ डागांची आवक झाली. फरशी, गवार आणि वालवड या पिकांना उच्चांकी दर मिळाला आहे काळावालला दहा किलोला एक हजार १११ रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.
आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर आणि शिरूर तालुक्यांतील शेतकरी मंचर बाजार समितीत आपल्या तरकारी पिकांची विक्री करण्यासाठी नियमितपणे येतात. लिलावानंतर शेतकऱ्यांना वजन, दर व रक्कमेची माहिती त्वरित मोबाईल एसएमएस अॅपद्वारे कळवली जाते, ही एक विश्वासार्ह प्रणाली बाजार समिती राबवत आहे, असे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.
शेतमालाचे नाव, १० किलोचे बाजारभाव (कंसात डागांची संख्या): गवार : पाचशे रुपये ते एक हजार रुपये(५८८), फरशी तीनशे रुपये तेपाचशे रुपये (१८), वालवड: ७०० रुपये -ते ९०० रुपये (४), फ्लॉवरः ८० रुपये ते१ ५१ रुपये (३९८९), भेंडी : २५० रुपये ते ५ ५५ रुपये (१४२), कारले : ३२५ रुपये ते५०० रुपये (४७७), दोडका :३५० रुपये ते ४५० रुपये (१५९), पावटा :८५० रुपये (८), लसूण ७ ५० रुपये(१), पापडी : ५०० रुपये - ते ७५० रुपये (१), टोमॅटो : २०० रुपये - ते ४१० रुपये (१९१).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.