‘तांबडेमळा- मंचर आगारासाठी नवीन एसटी बस दिल्या जातील’
मंचर, ता. २ : ‘‘माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार तांबडेमळा- मंचर (ता. आंबेगाव) आगारासाठी नवीन एसटी बस उपलब्ध करून दिल्या जातील. प्रवासी, विद्यार्थी व व्यावसायिकांची गैरसोय होणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात येईल. लवकरच बससेवा सुरळीत होईल,’’ असे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मुंबई येथे मंत्रालयात बुधवारी (ता. २) मंत्री सरनाईक व वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन व पुणे विभागीय नियंत्रक अरुण सिया आदी उपस्थित होते.
पुणे- नाशिक महामार्गावर तांबडेमळा आगार व मंचर बसस्थानक आहे. या बसस्थानकाच्या कार्यक्षेत्रात आंबेगाव तालुक्यातील १०३ गावे, भीमाशंकर देवस्थान, शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, सहा महाविद्यालय व ६९ माध्यमिक शाळा आहेत. देशातील विविध भागातील मुलांचे मंचरला वास्तव्य आहे. पण सध्या एसटी सेवा विस्कळित झाली असून, एसटी बसच्या कमतरतेमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाळुंगे पडवळ, मांदळेवाडी, लाखणगाव मुक्कामी एसटी बस बंद आहेत. आगाराच्या आवारात सिमेंट काँक्रिटीकरण झाले नाही, तसेच अन्य समस्या वळसे पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्या. नागरिकांना दिलासा मिळेल, अशा उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश सरनाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.