नैरोबीत सेंद्रिय शेती सादरीकरण

नैरोबीत सेंद्रिय शेती सादरीकरण

Published on

मंचर, ता. ३ मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषितज्ज्ञ ॲड. राहुल पडवळ यांनी नुकत्याच नैरोबी (केनिया) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय AICAD परिसंवादात भारताचे प्रतिनिधित्व केले व सेंद्रिय शेती आणि पर्यावरण संतुलनावर प्रभावी सादरीकरण केले.
पूर्व आफ्रिकेतील उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरू आणि तज्ज्ञांपुढे शाश्वत शेतीत भारताचे प्रयोग कसे दिशादर्शक ठरू शकतात हे पडवळ यांनी सांगितले. त्यांना आफ्रिकन क्षमताविकास संस्थेने निमंत्रित केले होते. दहा दिवसाचा दौरा करून ते नुकतेच मंचर येथे परतले.

‘मातीचे व मानवी आरोग्य वाचवायचे असेल तर रसायनमुक्त शेती हाच एकमेव पर्याय!’ असा संदेश त्यांनी दिला. पडवळ सध्या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पात सहायक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून, आफ्रिकेतील अनेक कृषी प्रकल्प व प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटून मातीची सद्यःस्थिती आणि भविष्यातील धोरणात्मक दिशा यावर सखोल अभ्यास करत आहेत.
सेंद्रिय कृषी निवेष्ठांचे पर्यावरण संतुलनासाठी महत्त्व व शाश्वत शेतीतील स्थान या विषयावरील सविस्तर सादरीकरण केले. त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात संवाद पार पडला. ‘पूर्व आफ्रिकेतील शेती व मातीची सद्यःस्थिती व भविष्य’ या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. सध्या जगभरात रासायनिक खते व कीटकनाशकांच्या झालेल्या दुष्परिणामांतून भविष्यातील अन्नसुरक्षा धोक्यात आली असून मातीच्या व मानवी आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होत आहेत. पूर्व आफ्रिकेतील देशांनी त्यातून बोध घेण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी शाश्वत शेती पद्धतींच्या माध्यमातून आवश्यक पावले उचलत या देशांसाठी विस्तृत धोरण आखणीच्या संदर्भात चर्चा झाली.

प्रश्नोत्तरांच्या सत्रात, पूर्व आफ्रिकेतील मातीच्या सद्यःस्थिती, कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम व अन्नसुरक्षेवरील धोके यावर मुद्देसूद माहिती दिली. भारतीय सेंद्रिय व नैसर्गिक शेतीतील प्रयोगांचे अनुभव शेअर केले. रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांतून शिकून, शाश्वत पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज आहे. भारतीय अनुभव त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
- ॲड. राहुल पडवळ, कृषीज्तज्ञ, मंचर
13557

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com