‘मंचर रुग्णालयात एम.डी. पद भरा’
मंचर, ता. ३ : येथील उपजिल्हा रुग्णालयात आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, संगमनेर व पारनेर तालुक्यातून दररोज सातशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. पण, येथे एमडी (मेडिसिन डॉक्टर) नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाने एम.डी. मेडिसिन डॉक्टर पद भरावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हा संघटकमंत्री सालीम इनामदार यांनी केली आहे.
इनामदार म्हणाले, ‘‘मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाचा राज्यात नावलौकिक आहे. त्यामुळे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होतात. या पार्श्वभूमीवर चार वर्षापासून रिक्त असलेल्या एम.डी. मेडिसिन पदावर डॉक्टरची नेमणूक करावी. अन्यथा १५ दिवसांनी आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.