पाच आरोग्य केंद्रांच्या
विस्तारासाठी निधी मंजूर

पाच आरोग्य केंद्रांच्या विस्तारासाठी निधी मंजूर

Published on

मंचर, ता. ४ : ‘‘आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य सुविधांना चालना देण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या २०२५-२६ या वर्षात योजनेतून ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मुख्य इमारतींच्या विस्तारीकरण व देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी १४ कोटी २७ लाख निधी मंजूर केला आहे. निधीसाठी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याकामी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सहकार्य मिळाले.’’ अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील यांनी दिली.
हिंगे पाटील म्हणाले की, हा निधी डिंभे, पेठ, अडिवरे, महाळुंगे पडवळ व कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणा व उन्नतीसाठी वापरण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्या, आजारांचे बदलते स्वरूप व उपचारांची गरज लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांची क्षमता वाढविण्यासाठी सरासरी प्रत्येक आरोग्य केंद्राला दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी दिला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com