पोच नको दाखलाच आणा
मंचर, ता.४ : सध्या ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जात आहे. परंतु मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ई.डब्ल्यू.एस) दाखला मिळण्याच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाकडे जमा केलेली पोच पावती विद्यालयाकडे सादर केली आहे. ‘पोच नको दाखलाच आणा’ असा पवित्रा विद्यालयांनी घेतला आहे. दाखला नसल्याने प्रवेश प्रक्रिया थांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंबेगाव तालुका मराठा समाजाचे नेते वसंतराव बाणखेले म्हणाले, ‘‘मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास मानून शासनाने एससीबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आयोग) अंतर्गत आरक्षणाची तरतूद केली होती. सुरुवातीस शासनाने या समाजातील विद्यार्थ्यांना ई.डब्ल्यू.एस व कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश देण्याचे सांगितले होते. यानुसार अनेक मराठा विद्यार्थ्यांनी ई.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र मिळण्यासाठी असलेली पोच विद्यालयाकडे जमा करून घेतली. पण प्रशासनाच्या नव्या नियमप्रणालीमुळे प्रशासनाकडून त्यांना दाखले मिळू शकत नाहीत. परिणामी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आली आहे.’’
तसेच पुढे ते म्हणाले, ‘‘या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांनी ई.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. अशा विद्यार्थ्यांना ११ वी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रशासनाने शिक्षण विभागाकडे आदेश पारित करावेत, या मागणीचा पाठपुरावा राज्य सरकारकडे सुरू आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.