महिला पत्रकाराला निघोटवाडीत मारहाण
मंचर, ता. ५ : निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे अनधिकृत पत्रा शेड व दुकानाचे वृत्तांकन व चित्रीकरण करत असताना महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यासह तिघांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एकूण दहा ते बारा जणांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मंचर पोलिस ठाण्यात सुधाकर बाबूराव काळे (रा. मुळेवाडी- मंचर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदर घटना घडली आहे. बारवे वृत्तांकन करत असताना पांडुरंग मोरडे, प्रशांत मोरडे व नीलेश मोरडे (रा. मंचर) व अन्य आठ ते नऊ अज्ञातांनी एकत्रित येऊन बारवे, काळे, संतोष काळे व विजेंद्र थोरात यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या हल्ल्याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात पांडुरंग मोरडे, प्रशांत मोरडे व नीलेश मोरडे यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.