अवसरीतील कार्यशाळेत ५२ जणांचा सहभाग

अवसरीतील कार्यशाळेत ५२ जणांचा सहभाग

Published on

मंचर, ता. ६ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात गुरुवारी (ता. ३) व शुक्रवारी (ता. ४) नळ पाणीपुरवठा योजनेच्या स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी, पाणी पुरवठा समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका असे एकूण ५२ जण सहभागी झाले होते.
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद आणि साई प्रेम ग्रामीण विकास संस्था, यवतमाळ यांच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा शुभारंभ दीपप्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला .यावेळी अवसरी खुर्दचे सरपंच वैभव वायळ, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील ,आदर्शगाव गावडेवाडीचे सरपंच विजय गावडे, तांबडेमळाचे उपसरपंच प्रवीण भोर ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिदोरे , तृप्ती सरेकर , विशाल ढसाळ, संदीप मानकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
जलजीवन मिशन अभियानाचा आढावा, भूजल शोध पद्धती, स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणासाठी विविध तंत्रज्ञान, नदी-नाले तंत्र तसेच भारतीय जलधोरण याविषयी यशदा, पुणे येथील प्रशिक्षक जया माने व प्रतिभा डहाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे माने यांनी दिली.


13588

Marathi News Esakal
www.esakal.com