पर्जन्यमापकाची दोन यंत्रे बसवा

पर्जन्यमापकाची दोन यंत्रे बसवा

Published on

मंचर, ता.६ : सातगाव पठार परिसरात गेल्या पावणेदोन महिन्यांपासून सतत पावसाचा जोर आहे. विशेष म्हणजे कुरवंडी, पेठ, भावडी, कोल्हारवाडी, थूगाव, कारेगाव, पेठ, पारगावतर्फे खेड गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्र नाही. त्यामुळे पडलेल्या पावसाची नेमकी होत नोंद नाही. त्यामुळे शासकीय मदतीसाठी आवश्यक असणारा पावसाचा आकडा उपलब्ध होत नाही. परिणामी नुकसानीच्या पंचनाम्यात अडथळा येतो. त्यामुळे परिसरात दोन पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस मोठा फटका बसला आहे. या भागात ज्या शेतकऱ्यांनी बटाट्याची वेळेवर लागवड केली, त्या शेतातील बियाणे अत्यंत ओलसर हवामानामुळे जमिनीतच कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर काही शेतकऱ्यांनी तर लागवड थांबवली असून, साठविलेल्या बटाटा वाण बियाण्याचे नुकसान होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आंबेगाव तालुक्याचे नेते डॉ. ताराचंद कराळे यांनी पुणे जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदन देऊन तातडीने कुरवंडी व पेठ येथे पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची मागणी केली आहे.

सातगाव परिसरात कृषी उत्पन्नाचा मुख्य आधार बटाटा पीक आहे. जर शासनाला शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल तर नेमका किती पाऊस पडला हे मोजता आलं पाहिजे. त्यासाठी हवामान अभ्यास व अंदाज प्रणाली उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने या भागात तातडीने पर्जन्यमापक यंत्रे बसवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देता येईल,” असे डॉ. कराळे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
13590

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com