आंबेगावला ३२ कामांसाठी ६ कोटी ९ लाखांचा निधी
मंचर, ता. ७ : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील नागरी सुविधा आणि रस्ते विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३२ कामांसाठी सहा कोटी नऊ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा नियोजन समितीचे सहकार्य लाभले, अशी माहिती माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
कामाचे नाव व मंजूर निधी प्रत्येकी (१५ लाख १० हजार रुपये)- पाबळ ते नप्तेवस्ती रस्ता, अवसरी बुद्रुक खंडोबा मंदिर ते घुलीरस्ता, अवसरी बुद्रुक गावठाण बाजारपेठ रस्ता, कवठे इचकेवाडी दशक्रिया घाट बांधणे, आंबेगाव गावठाण बंदिस्त गटर, कळंब ते माळीवाडा रस्ता, कवठे यमाई अष्टविनायक रस्ता ते गांजेवाडी चारी रस्ता, कळंब हायवे ते स्वप्नील वरपे कॅनल रस्ता, कळंब रा.मा. ५० शिरामळा ते घाटकडा ठाकरवाडी रस्ता, कवठे यमाई हिलाळवस्ती रस्ता, खडकी काळुबाई मंदिर ते बाणखेले रस्ता, खडकी बबनराव पोखरकर ते नदीकडे जाणारा रस्ता, केंदूर पहाडवाडी स्मशानभूमी परिसर सुधारणा, घोडेगाव गावठाण कुंभार आळी रस्ता, घोडेगाव स्मशानभूमी परिसर सुधारणा, केंदूर टिळकवाडी स्मशानभूमी शेड बांधणे, चांडोली बुद्रुक महादेव मंदिरासमोरील रस्त्यावर पेविंग ब्लॉक व दलितवस्ती रस्ता काँक्रीट, चास पिराचीवाडी खंडोबा मंदिर रस्ता, जांबुत बदरमाळ ते जोरी वस्ती रस्ता, घोडेगाव रा.मा. ११२ पानमळा वस्ती ते विकास काळे यांच्या शेतीकडे रस्ता, टाकळी हाजी मळगंगा कुंड ते साबळेवाडी रस्ता, निरगुडसर वरची कार वस्ती गणेश मंदिर रस्ता, चास शेगरमळा ते भटवाडी रस्ता, टाकळी हाजी लक्ष्मण गावडेवस्ती ते रोहिदास घोडे रस्ता, नारोडी माळवाडी रस्ता, निघोटवाडी ते तपनेश्वर मंदिर रस्ता, पाबळ ते सचिन जाधव वस्ती, नहेंबेद वस्ती रस्ता, निरगुडसर नवनाथ हिंगे ते श्री गणेश डोंगर रस्ता, पारगावतर्फे खेड येथे गंगेवाडी भागडे वस्ती रस्ता, मलठण नामदेव दंडवते वस्ती ते शिक्रापूर मुख्य रस्ता, पुनर्वसन गावठाण गावडेवाडी (फुलवडे) मुक्ताबाई परिसर रस्ता व बंदिस्त गटार, पेठ -कुरवंडी रस्ता ते गावठाण रस्ता, महाळुंगे पडवळ बंदवस्ती रस्ता, लांडेवाडी-चिंचोडी गावठाण पालखी रस्ता, रांजणगाव गणपती फंडवस्ती स्मशानभूमी आरसीसी शेड बांधकाम, निरगुडसर- बेलसरवाडी येथे भैरवनाथ मंदिर परिसरात विरंगुळा केंद्र (५० लाख रुपये)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.