जमिनीच्या नावात झालेल्या चुकांची दुरुस्ती
मंचर, ता. १६ : महसूल कायद्याच्या कलम १५५ अंतर्गत जमिनीच्या नावात झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी मंचर प्रांत कार्यालयात विशेष शिबिर पार पडले. यात तीन हजार ३०० प्रकरणांची तपासणी करण्यात आली. मंडल अधिकारी, कामगार तलाठी, नायब तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांना आंबेगाव व जुन्नर विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे मार्गदर्शन यांनी केले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात १५५ अंतर्गत दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासंदर्भात जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या निर्देशानुसार शिबिर पार पडले. चुकांची दुरुस्ती प्रकरणांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला. दरम्यान, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, अरविंद वळसे पाटील, गणेश बाणखेले, योगेश बोऱ्हाडे, विकास बाणखेले व रवी पांडे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.
‘शिबिरात २०२० ते २०२५ या कालावधीत झालेल्या नोंदींची तपासणी करण्यात आली. कलम १५५ अंतर्गत नाव, क्षेत्रफळ, वारसदारांची माहिती, फेरफार नोंद यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रे मागवून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली’, अशी माहिती नायब तहसीलदार सचिन मुंडे यांनी दिली.
जमाबंदी पत्रक (७/१२), फेरफार नोंद, जमीन नोंद इत्यादीत नाव, क्षेत्रफळ, वारसदारांची माहिती यासारख्या नोंदीत चूक, अपूर्णता किंवा त्रुटी आढळल्यास महसूल अधिकारी (तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार) त्या दुरुस्त करू शकतात. महसूल कलम १५५ नुसार कायदेशीर प्रक्रिया राबवून संबंधित व्यक्तीने अर्ज सादर करावा लागतो. सुनावणी घेतली जाते व आवश्यक कागदपत्रांच्या आधारे निर्णय दिला जातो.
- गोविंद शिंदे, प्रांताधिकारी मंचर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.