गावडेवाडीत एक हजार फळझाडांची लागवड
मंचर, ता. ५ : आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे ‘एक पेड माँ के नाम’ या प्रेरणादायी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये एक हजार फळझाडांची लागवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २३३ विद्यार्थ्यांच्या मातांच्या हस्ते पार पडली.
वृक्षारोपणात आंबा, चिकू, जांभूळ, सीताफळ, आवळा, लिंबू, चिंच व बांबू यासारख्या विविध प्रकारच्या फळझाडांचा समावेश होता.
खड्डे घेण्यापासून ते पाच वर्षांपर्यंत झाडांच्या संगोपनापर्यंतचा संपूर्ण खर्च १४ ट्री या संस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा यांच्यामार्फत हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यावेळी कृषी तज्ज्ञ राजू शिंदे, संतोष गावडे, विठ्ठल गावडे, १४ ट्री संस्थेचे प्रतिनिधी बजरंग बोरकर, मुख्याध्यापिका मंदा लोंढे, बबू शेळके, सोनाली गावडे, शोभा गावडे, शशिकला चिखले, राजेंद्र गावडे, विनायक गावडे, एकनाथ गावडे आदी उपस्थित होते.
फळबागेतून होणारे उत्पन्न शाळेला मिळणार आहे. यामुळे झाडांची संख्या वाढून निसर्गाचा समतोल राखला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षलागवडीविषयी आवड निर्माण होईल.
-विजय धोंडीबा गावडे, सरपंच, गावडेवाडी.