शिमला-हिमाचलमधील बटाटा वाणाची लागवड करा
मंचर, ता.१२ : “देशातील चिप्ससाठी उत्तम प्रतीचा बटाटा उत्पादन करणाऱ्या प्रदेशांमध्ये आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसराचा लौकिक कायम आहे. या भागातील शेतकऱ्यांनी शिमला-हिमाचल प्रदेश येथील नुकत्याच विकसित झालेल्या उच्च उत्पादनक्षम व प्रक्रियायोग्य बटाट्याच्या नव्या वाणाची लागवड करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित बटाट्याला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल. याकामी योगनिल अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने पुढाकार घ्यावा.” असे आवाहन शिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ब्रजेश सिंग यांनी केले.
आदर्शगाव कुरवंडी (ता.आंबेगाव) येथील बटाटा पिकाला व योगनिल कंपनीला डॉ. सिंग यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पथकाने भेट दिली. पथकात केंद्रीय बटाटा संशोधन संस्था उटीचे वरिष्ठ शास्तज्ञ डॉ. प्रियांक म्हात्रे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर, अखिल भारतीय समन्वित बटाटा संशोधनचे प्रकल्प अधिकारी डॉ. रवींद्र पवार व कनिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जी.एम. बनसोडे यांचा समावेश होता.
डॉ.सिंग यांनी बटाटा उत्पादन करणारे शेतकरी व शेतकरी कंपनीच्या कामकाजाचे कौतुक केले. योगनिल कंपनीचे संचालक विकास बारवे यांनी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. ते म्हणाले, “पूर्वी बियाणे पंजाबमधून आणल्यानंतर ते दूरच्या शीतगृहात ठेवावे लागत होते. काढणीनंतर शीतगृहांच्या अभावामुळे बटाटा कमी दरात विकावा लागत होता. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी कंपनीची स्थापना केली. राज्य शासन व जागतिक बँकेच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत शीतगृह, एकात्मिक पॅक हाऊसचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.”
13859
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.