घोड नदीकाठच्या ३५ गावांना सतर्कतेचा इशारा
मंचर, ता.२०: आंबेगाव तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणाच्या सांडव्यावरून तब्बल २० हजार ९२० क्यूसेक पाणी घोड नदीच्या पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या डिंभे गावापासून लाखणगावपर्यंतच्या ३५ गावे व २५ वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी नदीकाठचे कृषिपंप व गुरांचे गोठे सुरक्षित ठिकाणी हालवावेत,नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक व नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी केले आहे.
चांडोली खुर्द येथे काही शेतकऱ्यांचे कृषीपंप वाहून गेल्याची माहिती शेतकरी नीलेश बांगर यांनी दिली. ते म्हणाले की, प्रथमच येथील बंधाऱ्याला व पुलाला पाणी लागले. स्मशानभूमी परिसरात पाणी आले. अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत.
उपसरपंच अमोल दाभाडे म्हणाले, की चांडोली खुर्द नळ योजना पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीत पुराचे पाणी गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून करून प्यावे.
एकलहरे, चिंचोडी, पिंपळगावतर्फे महाळुंगे, चांडोली खुर्द, सुलतानपूर, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे आदी ग्रामपंचायती सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांमध्ये सतर्कता आणि जनजागृती केली जात आहे, अशी माहिती पिंपळगाव तर्फे महाळुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक पोखरकर यांनी दिली.
दरम्यान, मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तरकारी आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. सतत पाऊस पडत असल्याने शेतात तरकारी मालाची तोडणी करता येत नाही. त्यामुळे येथे होणाऱ्या शेतीमाल आवकवर परिमाण झाला आहे.
सर्वसाधारणपणे दरोरोज दहा हजार डाग आवक होते पण आज बुधवारी(ता.२०) पाच हजार तरकारी डाग आवक झाली असे बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात व उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
13921
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.