परदेशी आयातदारांची केळी बागांना भेट

परदेशी आयातदारांची केळी बागांना भेट

Published on

मंचर, ता.३ : पिंपळगावतर्फे महाळुंगे (ता.आंबेगाव) येथील माडीवाले ॲग्रो फार्मिंग अँड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व इफिक्की यांच्या संयुक्त प्रयत्नातून दक्षिण आफ्रिका व संयुक्त अरब अमिराती येथील आयातदारांनी पिंपळगाव, निरगुडसर व रांजणी परिसरातील केळी बागांना भेट दिली व पाहणी केली.

आंबेगाव, करमाळा, सांगोला, इंदापूर व दौंड या तालुक्यातून ३०० एकर क्षेत्रात केळीचे उत्पादन घेतले असून जवळपास एक हजार ४०० टन केळीची निर्यात केली आहे. निर्यात केळीला प्रति किलोला सरासरी २२ ते ३४ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती माडीवाले ऍग्रो फार्मिंग अँड प्रोसेसिंग कंपनीचे अध्यक्ष नितीन पोखरकर यांनी दिली.
ते म्हणाले, सध्या सोलापूर व पुणे जिल्ह्यातील केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यूएई, सौदी अरेबिया, कतार, बहारीन, ओमान, कुवैत, युरोपियन देशांमध्ये व अमेरिकेत केळी पावडर व अन्य उत्पादनासाठी मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांना उत्तम दर व स्थिर बाजारपेठेची संधी उपलब्ध झाली आहे
दरम्यान, केळी पिकाची गुणवत्ता, निर्यात संधी, शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे पॅकेजिंग व प्रमाणपत्र प्रक्रिया यासंदर्भात सविस्तर माहिती माडीवाले ॲग्रोचे संचालक सुमित गुंड व संग्राम गुंड यांनी दिली.
केळी उत्पादनासाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान योजनांची माहिती इफिक्कीचे अध्यक्ष प्रवीण वानखडे यांनी दिली. शेतकरी उत्पादक कंपन्या व आयातदार यांच्यात संवाद झाला. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

दृष्टिक्षेपात
• एकरी उत्पादन : ३० ते ३५ टन
• निर्यात : २४ ते २५ टन
• स्थानिक बाजार पेठेत विक्री : ९ ते १० टन
• एकरी खर्च : दीड लाख रुपये
• उत्पादन कालावधी : ११ ते १३ महिने
• एकूण अनुदान : एक लाख वीस हजार
• एकरी खर्च वजा जाता मिळणारी रक्कम : पाच ते सहा लाख रुपये.

14043

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com