‘सकाळने माझं आयुष्य उजळवलं’

‘सकाळने माझं आयुष्य उजळवलं’

Published on

मंचर, ता. १४ : ‘‘थोर विचारवंत आणि समाजपरिवर्तनाचे अग्रदूत कै. नानासाहेब परुळेकरांनी सुरू केलेल्या ‘सकाळ’ने माझं आयुष्यच उजळवलं, विचारांना नवा वेध दिला आणि जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला,’’ असे पेठ (ता. आंबेगाव) येथील वृत्तपत्र विक्रेता सुधाकर जगन्नाथ हिरवे यांनी सांगितले.
सन १९६७ मध्ये केवळ १२ वर्षांचा असताना त्यांनी ‘सकाळ’चे अंक विकण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. वडील शिवणकाम करून संसाराचा गाडा ओढत होते. शिक्षण पुढे सुरू ठेवणे कठीण असतानाही हिरवे यांनी वाचनाची आवड जोपासली. घरात एक अंक यावा या हेतूने ते सकाळ प्रेसमध्ये वर्गणी भरण्यास गेले. पण नियतीने त्यांना एजन्सीचा वारसा दिला. फक्त पाच अंकांचे डिपॉझिट भरून त्यांनी सकाळ एजन्सी सुरू केली. वर्तमानपत्र विक्रीच्या कमीशनमधूनच हिरवे यांनी शिक्षण सुरू ठेवले. सेंट्रल बँकेच्या स्कीम एजन्सी मिळवली आणि नंतर सन १९८४ साली कापड व्यवसाय सुरू करून संसार उभा केला.
त्यावेळी माझ्या दोन्ही मुली अर्चना आणि पोर्णिमा यांनी व्यवसायात मला फार मोलाची मदत केली. तसेच, या कामात माझा मुलगा जयदीप व सूनबाई रूपाली आनंदाने मदत करीत आहेत. या वाटचालीत पत्नी शारदा हिने जो हातभार लावला.

‘‘सकाळने मला विचारांची श्रीमंती दिली, लोकांशी जोडण्याची कला शिकवली. आज जे काही आहे, ते सकाळमुळेच.’’
- सुधाकर हिरवे, वृत्तपत्र विक्रेते

14355

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com