पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी मंचरमध्ये सर्व तयारी पूर्ण

पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी मंचरमध्ये सर्व तयारी पूर्ण

Published on

मंचर, ता.३० : मंचर (ता. आंबेगाव)नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदान मंगळवारी (ता.२) होणार आहे. पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शहरातील २४ मतदान केंद्रांवर कामकाज सुरळीत पार पडावे म्हणून एकूण १४४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मंचर नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्चना कुलकर्णी यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक एक बिनविरोध झाल्याने या प्रभागातील मतदार आता फक्त नगराध्यक्ष पदासाठीच मतदान करणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई आणि एक पोलिस कर्मचारी अशी रचना ठेवून निवडणुकीचे मनुष्यबळ बळकट करण्यात आले आहे.
मुस्लिम बहुल भागांतील महिला मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्दानशीन मतदान केंद्रांची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. येथे अतिरिक्त महिला कर्मचारी नेमून ओळख तपासणी व मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव यांनी सांगितले.
प्रशासनाने राबवलेल्या या नेमक्या आणि काटेकोर तयारीमुळे नगरपंचायत निवडणूक शांत, सुरळीत आणि पारदर्शक पार पडेल," असे कुलकर्णी यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com