मंचरमध्ये मताला फुटला
पाच हजारापर्यंतचा बाजार

मंचरमध्ये मताला फुटला पाच हजारापर्यंतचा बाजार

Published on

मंचर, ता. १ : मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रथमच होत आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवार व १६ नगरसेवकपदासाठी ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारी (ता. २) मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली असून, मताला तीन हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यंत बाजारभाव फुटल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप युतीच्या उमेदवार मोनिका बाणखेले, शिवसेनेच्या उमेदवार राजश्री गांजाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युतीच्या उमेदवार रजनीगंधा बाणखेले, काँग्रेसच्या उमेदवार फर्जिन मुलांनी, अपक्ष प्राची थोरात, अपक्ष जागृती महाजन या उमेदवारांमध्ये लढत आहे. आम्हालाच मतदान करा, अशी विनंती करून मतदारांना आर्थिक मोबदला हॉटेल, पान टपऱ्या येथे निवडणूक स्लिपबरोबरच दिला जात आहे. हे काम अत्यंत शिस्तीत व गुप्तपणे सुरू आहे. मांसाहारींसाठी मासे, पॉपलेट, चिकन, मटन बिर्याणीची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलपर्यंत न येणाऱ्यांसाठी पार्सले पाठवले जात असल्याचे एका हॉटेल मालकाने सांगितले. विशेष म्हणजे आपल्या प्रभागातील सर्वच उमेदवारांना मतदारांकडून तुम्हालाच मतदान, असे आश्वासित केले जात आहे, प्रत्यक्षात कोणाला मतदान देणार, हे मात्र निवडणूक निकालानंतरच पुढे येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com