मंचरमधील विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे जनजागृती
मंचर, ता.१३ : येथील महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंचर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी (ता.१३) व्यसनमुक्ती, मोबाइलचा अतिवापर व वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होणारे अपघात याविषयी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. पथनाट्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पथनाट्याचा शुभारंभ मुख्याध्यापिका चित्रा बांगर, ॲड. बाळासाहेब पोखरकर, प्रा. सुहास खेडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रतिभा कहडणे, डॉ. एस. बी. दिघे, सुहास मानेकर उपस्थित होते. मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे मानसिक ताण व अभ्यासाकडे दुर्लक्ष, वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणाऱ्या अपघातातून घडणाऱ्या दुर्घटना, व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे होणारे विविध आजार व कुटुंबावर होणारा परिणाम याविषयी ईश्वरी शिंदे, अनुष्का निघोट, प्रांजल सोमवंशी, मानवी बाणखेले, सार्थक बाणखेले, आर्यन अमुंडकर, आर्यन गावडे, आर्यन गुलाने, साकिब मीर (इयत्ता ७वी) आराध्या निरखे, श्रेया दाते, आर्यही बाणखेले, स्वरा आल्हाट, जानवी मोदी, अनुश्री घोगरे, संग्राम लोंढे, कृष्णा थोरात, देवेन निघोट, अथर्व सावंत, अर्थव शिंदे, सूरज यादव (इयत्ता ८ वी ) अनिष्ठा यादव, अपेक्षा गुंडाळ, ईश्वरी रणदिवे, निहारिका अरगडे, उबेद इनामदार, निखिल भोर, रूपेंद्र निषाद, आर्यन रोकडे, मोहित मौर्य, साईचरण पवार, आराध्या काळे, सायली थोरात, स्वरा बोऱ्हाडे, देवयानी एरंडे,( इयत्ता ९ वी) यांनी केलेले सादरीकरण लक्षवेधक ठरले.
4792
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

