मंचरमध्ये शुक्रवारी राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा
मंचर, ता. ३१ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ‘अण्णासाहेब आवटे राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धे’चे आयोजन शुक्रवारी (ता. ३) करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला व अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी विविध समकालीन विषयांवर ही स्पर्धा होणार असल्याचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी सांगितले.
स्पर्धा माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ अशा तीन गटांमध्ये होणार आहे. गटाचे नाव व विषय - माध्यमिक गट - पुस्तक वाचनाचे महत्त्व, स्वच्छ भारत माझी जबाबदारी, मानसिक आरोग्य आणि विद्यार्थी, पर्यावरण आणि नागरिकांची कर्तव्ये, डिजिटल युगातील ज्ञानक्रांती
कनिष्ठ गट - सध्याचे राजकारण, लोकशाहीचा उत्सव की कीड, भारताची एकता आणि अखंडता, कृत्रिम बुद्धिमत्ता - एक आव्हान, शाश्वत विकास आणि पर्यावरण, त्रिभाषा सूत्र : गरज की हानी
वरिष्ठ गट-शेतकरी आत्महत्या आणि युवकांची भूमिका, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) - भविष्यवेध : संधी की धोका, आरक्षणाचे धोरण - गरज की राजकारण, ‘लाईक, शेअर अॅण्ड सबस्क्राईब’ - आपण नेमके कुठे चाललो आहोत?
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी वक्तृत्व स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. पी. पी. इंजळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी केले आहे.

