मंचर येथील शिबिरात
५६३ जणांचे रक्तदान

मंचर येथील शिबिरात ५६३ जणांचे रक्तदान

Published on

मंचर, ता. २१ : येथील मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्था, राणाप्रताप प्रतिष्ठान व अवधूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मंचर नगरपंचायतीच्या सभामंडपात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ५६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली. त्यामध्ये ४० दिव्यांगांचा सहभाग होता, अशी माहिती मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर व सचिव प्रिया पोखरकर यांनी दिली.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने ११ भाग्यवान विजेत्यांना हेल्मेट, बाथरूम सेट, जेवणाचे डबे, मिक्सर, पंखे आदी भेटवस्तूंचे वितरण व सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा राजश्री गांजाळे, उपनगराध्यक्ष संदीप उर्फ लक्ष्मण थोरात, नगरसेवक वसंतराव बाणखेले, ऊर्मिला मोरडे, डॉ. सोनाली बाणखेले, घोडेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड संजय आर्वीकर, मैत्री हेल्थ केअर संस्थेच्या कायदेशीर सल्लागार ॲड शुभांगी पोटे, विकास बाणखेले, प्रवीण मोरडे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदात्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकास रक्ताची गरज भासल्यास दोन रक्तपिशव्या मोफत दिल्या जातील, असे राणाप्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बाणखेले यांनी सांगितले.
दिव्यांग संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष समीर टाव्हरे, सचिन भालेराव, रंगनाथ पोखरकर, भाऊ निघोट, इरफान पठाण, देवानंद भगत यांनी व्यवस्था पाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com