मंचर उपजिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल
डी. के. वळसे पाटील ः सकाळ वृत्तसेवा
मंचर, ता. २१ : राज्यात कार्यरत असलेल्या ६३ उपजिल्हा रुग्णालयांपैकी दररोज सरासरी ५५० हून अधिक रुग्णांवर उपचार करणारे मंचर (ता. आंबेगाव) उपजिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे चित्र समोर आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत या रुग्णालयात एक लाख ९४ हजार ३३२ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी अधिकृत नोंद आरोग्य विभागात आहे. आंबेगावसह खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यांतील रुग्णांबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होत आहेत.
ग्रामीण भागात असूनही अद्ययावत सुविधा आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे हे रुग्णालय नागरिकांसाठी आधारवड ठरत आहे. येथे सिटीस्कॅनसारखी महागडी तपासणी मोफत उपलब्ध असून, ही सेवा २४ तास कार्यरत आहे, हे विशेष आहे. जन्मजात आजार व गंभीर आजारग्रस्त नवजात बालकांसाठी १० खाटांचा अतिदक्षता विभाग (NICU) कार्यरत आहे. डायलिसिस सात बेड आहेत. दर महिन्याला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्राक्रिया केल्या जातात. या व्यतिरिक्त सर्पदंश, विषबाधा यांसारख्या अत्यवस्थ रुग्णावर अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार केले जातात. जागतिक सर्पदंश उपचार तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचेही विनामूल्य सहकार्य मिळते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ पल्ले यांच्यामुळे बी. जे. मेडिकल कॉलेजसह भारती मेडिकल कॉलेज व डी. वाय. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे, अशी माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांनी दिली.
वर्षभरातील सेवा
बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) - १ लाख ९४ हजार ३३२
आंतररुग्ण दाखल - ९ हजार १९६
एकूण प्रसूती - १ हजार ६६८
नॉर्मल प्रसूती - ८४९
सिझेरियन प्रसूती - ८१९
मोठ्या शस्त्रक्रिया - १ हजार ४९१
छोट्या शस्त्रक्रिया - ५ हजार ९१८
मोतीबिंदू शस्त्रक्रिया- ४८८
एक्स-रे - २२ हजार ७४९
सोनोग्राफी - ४ हजार ५०९
सिटी स्कॅन - १३ हजार ८६६
ईसीजी- ६ हजार ६०७
डायलिसिस - २ हजार २७९
प्रयोगशाळा तपासण्या - १ लाख ५२ हजार ७२०
आपत्कालीन व विशेष सेवा
सर्पदंश रुग्णसेवा - १८०
विषबाधा रुग्णसेवा - १८९
बिबट्यांच्या हल्ल्यातील रुग्ण - ३८
श्वान हल्ला रुग्ण - २ हजार ५३१
शवविच्छेदन- १९९
कर्करोग तपासणी
कर्करोग स्क्रिनिंग - १५ हजार ७९६ रुग्ण
संशयित रुग्ण - ८९
बायोप्सी तपासणी - ५५
कर्करोग निदान झालेले रुग्ण - २३
पराग मिल्क फूड्स, मोरडे फूड्स, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, शरद बँक व अनेक दानशूर व्यक्तींनी उपजिल्हा रुग्णालयाला वेळोवेळी आर्थिक मदतीतून आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. मुक्कामी रुग्णांना, जेवण, नाष्टा व चहाची विनामूल्य सोय केली जाते.
- जगदीश घिसे, सदस्य, रुग्णकल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय, मंचर
वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय
रुग्णांचा वाढता ओघ, मर्यादित मनुष्यबळ असूनही डॉक्टर, परिचारिका व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा आदर्शवत असल्याचे चित्र आहे. रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांच्या समन्वयातून हे यश साध्य झाले असून, ग्रामीण
आरोग्यसेवेसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालय एक आदर्श मॉडेल ठरत आहे.
उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर
पदनाम मंजूर भरलेली रिक्त
एकूण वैद्यकीय अधिक्षक, वर्ग- १ १ १ ०
एकूण वैद्यकीय अधिकारी, वर्ग- २ १८ १८ ०
वैद्यकीय अधिकारी (दंतचिकित्सा) १ १ ०
वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) १ ० १
एकूण प्रशासकीय पदे (वर्ग-३) ८ ६ २
एकूण शुश्रूषा तांत्रिक पदे वर्ग-३ ५६ ४७ ९
एकूण चतुर्थश्रेणी कर्मचारी, वर्ग-४ ३० २२ ७
एकूण ११४ ९५ १९
15051
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

