भैरवनाथ विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह जागृती
मंचर, ता. ३ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व सौ. वनिता विठ्ठल अभंग तांत्रिक व किमान कौशल्य विद्यालयात वाहतूक सुरक्षा अभियान-२०२६ अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थी व समाजात जनजागृती व्हावी म्हणून वाहतूक नियमावर आधारित निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत २८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह परिसरातील वाहनचालक व नागरिकांना वाहतूक नियम, महामार्गावरील अपघातांची कारणे व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आळेफाटा वाहतूक पोलिस केंद्राचे उपनिरीक्षक संतोष डोलारे व तानाजी वाघ यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.
यावेळी अपघात घडल्यास तात्काळ ११२, १०३३, १०८, १९३०, १०९८, १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या विद्यार्थ्यांची नावे: इयत्ता ५ वी ते ७ वी गट ः प्रथम- अनुश शिंदे, द्वितीय- मुंजाजी रौंदळ, तृतीय- शर्वरी शिंदे,
इयत्ता ८ वी ते १० वी गट ः प्रथम - अर्णव शिंदे, द्वितीय- अविराज कोळेकर, तृतीय- शर्वरी शिंदे
मुख्याध्यापक धीरज कोळेकर, चित्रकला विभागाचे शिक्षक दिलीप चौधरी, योगिता शिंदे, हसीना जमादार, सर्व शिक्षकवृंद तसेच महामार्ग पोलिस प्रशासनाने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळा समिती सदस्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

