लांडेवाडीत ‘अॅस्ट्रॉनॉमी रिसर्च अँड करिअर’ मार्गदर्शन
मंचर, ता. १७ : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅस्ट्रॉनॉमी रिसर्च अँड करिअर’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. या उपक्रमात इयत्ता सहावी ते आठवी तसेच अकरावीतील एकूण ५२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) पुणे येथील पोस्ट-डॉक्टोरल फेलो डॉ. सारंग शाह उपस्थित होते.
सत्रादरम्यान त्यांनी ऑप्टिकल, इन्फ्रारेड, एक्स-रे, गॅमा किरणे व रेडिओ वेधशाळांद्वारे संशोधनाची प्रक्रिया स्पष्ट केली. मशीन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खगोल संशोधनातील वापरही उदाहरणांसह सांगितला. चिली येथील सेरो पाचोन पर्वतावर उभारण्यात आलेल्या ‘वेरा सी. रुबिन वेधशाळा’ या अत्याधुनिक वेधशाळेची माहिती देताना त्यांनी ८.१ मीटर व्यासाचा मुख्य आरसा व ३ गिगापिक्सेल क्षमतेच्या कॅमेऱ्याचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत सत्र संवादात्मक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शाह यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे अशा उपक्रमांचे आयोजन शक्य होत असल्याचे नमूद केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा. शामल चौधरी, प्राचार्या शबनम मोमीन, प्राचार्या रजनी बाणखेले, शिक्षकवृंद उपस्थित होते. विज्ञान शिक्षक सतीश भेरे यांनी व्यवस्था पाहिली. सूत्रसंचालन महादेव गायकवाड यांनी केले.
या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी उत्सुकता वाढून संशोधन क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

