सात समुद्रापार पॅरिसमध्ये जयघोष
मंचर, ता. २० : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित परदेश अभ्यास दौऱ्याअंतर्गत युरोप दौऱ्यावर गेलेल्या ५२ शेतकऱ्यांनी पॅरिस येथे गुरुवारी (ता. १९) मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसच्या मुख्य चौकात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
संगमनेर येथील शिवभक्त संतोष डोंगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो सोबत आणला होता. पॅरिसच्या प्रमुख चौकामध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रगतशील शेतकरी विजया अंबाडे, संतोष डोंगरे, तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, तसेच आंबेगाव तालुक्यातील शेतकरी ऋषिकेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारताचा तिरंगा ध्वज शिवरायांच्या प्रतिमेमागे लावण्यात आला होता.
पॅरिसमध्ये शिवजयंती साजरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले. या दौऱ्यात अशोक दरेकर (नारायणगाव), नीलेश धपाटे, संभाजी नरुटे, दीपक गलांडे, शिवाजी तरंगे (सर्व इंदापूर), तसेच संतोष डोंगरे (संगमनेर) यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले आहेत.
15287
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

