डॉ. तुषार ओरपे यांना 
अकाउंट्समध्ये पीएच.डी.

डॉ. तुषार ओरपे यांना अकाउंट्समध्ये पीएच.डी.

Published on

मंचर, ता. २० : येथील डॉ. तुषार दत्तात्रेय ओरपे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून अकाउंट्स अँड ऑडिटिंग विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ओरपे यांना कुणाचाही आधार नव्हता. त्यांनी हॉटेलसह मिळेल त्या ठिकाणी काम करीत बारावी (कॉमर्स) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बी. कॉम. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी एका लेखापालाकडे नोकरी करीत अनुभव घेतला. त्याचबरोबर एमबीए (फायनान्स) शिक्षण पूर्ण केले. पीएच.डी. करण्याचा ध्यास घेत त्यांनी सलग तीन वर्षे अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. गरवारे वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पुणे येथील प्रा. डॉ. सुनील झगडे हे त्यांचे मार्गदर्शक होते. पुढील काळात लहान व गरीब व्यावसायिकांना नाममात्र शुल्कात ताळेबंद तयार करून देणे, आयटीआर व जीएसटी रिटर्न भरण्यास मदत करणे, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com