सोमवारपासून गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण
मंचर, ता. ५ : महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार (ता. ८) पासून आंबेगाव तालुक्यात १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षांखालील सर्व मुलींना गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही लस मोफत देण्यात येणार आहे. तालुक्यातील सुमारे दोन हजार मुलींना या मोहिमेचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. याबाबतची तयारी झाल्याची माहिती आंबेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पवार व मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, ‘‘महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयमुख कर्करोगासाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) हा विषाणू प्रमुख कारणीभूत मानला जातो. त्यावरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लस उपयुक्त ठरते. ही लस १४ ते १५ वयोगटातील मुलींना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणार आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून ती देण्यासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक राहणार आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी मुलींना लसीकरणासाठी पुढे आणावे.’’
महिला दिनापासून मोहिमेला सुरुवात होणार असून तीन महिन्यांत सर्व लाभार्थी मुलींचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दृष्टीक्षेपात
- लसीकरण मोहिमेला ८ मार्चपासून एचपीव्ही प्रारंभ
- १४ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे २ हजार मुली लाभार्थी
- प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत लस उपलब्ध
- महिला आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम
येथे मिळेल लस
सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मंचर, घोडेगाव, तळेघर ग्रामीण रुग्णालय, अडीवरे, तीरफाड, डिंभे, लांडेवाडी, महाळुंगे पडवळ, पेठ, अवसरी खुर्द, निरगुडसर, धामणी, शिंगवे, रांजणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

