आंबेगावच्या दिव्यांगांना निधी देण्याची मागणी

आंबेगावच्या दिव्यांगांना  
निधी देण्याची मागणी
Published on

मंचर, ता. १३ : आंबेगाव तालुक्यात ३५४७ दिव्यांग बांधव आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निधीतून ३० लाख रुपये निधीची तरतूद माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करावी, अशी मागणी दिव्यांग संघटना आंबेगाव तालुका यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंचर येथे वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले. दिव्यांग व्यक्तींसाठी पायाभूत सुविधांसाठी तसेच गरजेच्या साहित्यासाठी निधीची गरज आहे. दिव्यांग निधीबाबत शासन आदेश ता.२७ फेब्रुवारी २०२३ जारी करण्यात आला आहे. राज्यातील व पुणे जिल्ह्यातील बहुतांशी आमदार आपला दरवर्षीचा दिव्यांग निधी खर्च करत नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीनुसार पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाही. दिव्यांग व्यक्तींसाठी पेट्रोलवर/इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या टू व्हीलर द्याव्यात, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली.
वळसे पाटील यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधून माहिती घेऊन आपण हा निधी लवकर आपल्या तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी खर्च करू, असे आश्वासन दिले. यावेळी दिव्यांग संघटनेचे समीर टाव्हरे, सुनील दरेकर, नवनाथ भोर, ललिता बोऱ्हाडे, शोभा पिंगळे, सविता काळे, पुष्पाताई आवटे, दीपा गावडे, भाऊसाहेब वाळुंज, जालिंदर थोरात, ज्ञानेश्वर शिंदे आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com