आंबेगावात दक्षता पथकांची करडी नजर

आंबेगावात दक्षता पथकांची करडी नजर

Published on

मंचर, ता. १४ : आंबेगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी तहसील प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यात सध्या इंडियन गॅस, भारत गॅस आणि एचपीसीएलच्या मिळून एकूण सहा गॅस एजन्सी कार्यरत असून, सिलिंडर वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी तालुका स्तरावर दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली.
ते म्हणाले, "घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण करताना कंपनीमार्फत ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या ओटीपीची पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सिलिंडरचा गैरवापर होऊ नये आणि योग्य लाभार्थ्यांनाच पुरवठा व्हावा, यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच दक्षता पथकांकडून गॅस एजन्सींच्या नियमित तपासण्या करून सिलिंडरची दैनंदिन आवक-जावक तपासली जाणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान, आंबेगाव तालुक्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा भासणार नसल्याने नागरिकांनी अनावश्यक साठवणूक करू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार डॉ. वाघ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com