आंबेगावात तीन गावांमध्ये खासगी पाण्याचे टँकर सुरू
मंचर, ता. १४ : आंबेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून कारेगाव, थुगाव आणि पारगावतर्फे खेड या तीन गावांसाठी खासगी पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. या टँकरद्वारे परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ६ हजार ८२५ नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती कैलास काळे यांनी दिली.
भावडी, कुरवंडी, पेठ, निघोटवाडी, दस्तुरवाडी, माळीण, पहाडदरा आणि वडगावपीर या ग्रामपंचायतींचे टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, लवकरच त्या गावांमध्येही पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, त्यांनी पंचायत समिती आंबेगाव, घोडेगाव येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती पारधी व गटविकास अधिकारी प्रमिला वाळूज यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

