व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प
मंचर, ता. १५ : आंबेगाव तालुक्यात प्रशासनाने रविवारी (ता. १५) व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे वितरण तात्पुरते बंद केल्याने हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवल्याने तालुक्यात तीव्र असंतोष पसरला आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने १४ मार्च २०२४ च्या आदेशानुसार घरगुती गॅस वितरणाला प्राधान्य दिले आहे. याचा फटका आंबेगाव तालुक्यातील १०३ गावे आणि मंचरमधील सुमारे १२०० हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बसला आहे. तालुक्यातील हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे सात ते आठ हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. सध्या लग्नसराई आणि यात्रांचा हंगाम असल्याने ग्राहकांची गर्दी असतानाच गॅस टंचाई निर्माण झाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
शासन आदेशानुसार मर्यादित पुरवठा
"शासकीय परिपत्रकानुसार सध्या घरगुती गॅस आणि अत्यावश्यक सेवांना (रुग्णालये, संरक्षण क्षेत्र, रेल्वे इ.) प्राधान्याने पुरवठा केला जात आहे. अन्य हॉटेल व्यावसायिकांबाबत पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतरच गॅस वितरण सुरळीत करण्यात येईल," अशी माहिती आंबेगाव तालुक्याच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी माधुरी संतोषवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

