मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी वळसे पाटील
मंचर, ता. १९ : आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सुनील वळसे पाटील, कार्याध्यक्षपदी राजू आढळराव पाटील तर सचिवपदी अनिल देसले यांची बिनविरोध निवड झाली. मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात मुख्याध्यापक संघाची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार विजेते निवृत्त मुख्याध्यापक ए. एफ. इनामदार हे होते. या वेळी निवड झालेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये नितीन बाणखेल, प्रकाश इंदोरे, कांताराम टावरे, निशाद मोमीन, उज्ज्वला भालेराव, सुरेश जारकड, आनंद कोकणे, दत्तात्रेय काळे, भगवान भालेराव, भगवान माळवे आदींचा समावेश होता. दरम्यान, तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये ५०० हून अधिक शिक्षकांना लवकरच शिक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील वळसे पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

