आंबेगाव, खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना पौष्टिक किट वाटप

आंबेगाव, खेड तालुक्यातील 
विद्यार्थ्यांना पौष्टिक किट वाटप
Published on

मंचर, ता. २७ : आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी भागातील ३७५ विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीसाठी ‘इंडिया फूड बँकिंग नेटवर्क’, लुब्रिझोल आणि शाश्वत संस्थेतर्फे पौष्टिक किटचे वाटप करण्यात आले. डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या काळात हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांमधील ६ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. किटमध्ये गुळ, शेंगदाणे, डाळ, पोहे, रवा, लापशी, तेल आणि दूध अशा पोषक घटकांचा समावेश होता. वाळुंजवाडी, दस्तुरवाडी, माळीन, शिरगावसह १५ गावांतील शाळांनी यात सहभाग घेतला. उपक्रमात पारदर्शकतेसाठी पालकांच्या सह्या घेण्यात आल्या, तसेच विद्यार्थ्यांचे वजन व शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुला गवारी, प्रतिभा तांबे, शांताराम गुंजाळ, अरुण पारधी, कोंडिबा असवले व देवराम असवले यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

15526

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com