मंचरला आजपासून बाणखेले व्याख्यानमाला

मंचरला आजपासून
बाणखेले व्याख्यानमाला
Published on

मंचर, ता. १५ : येथे ‘शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव २०२६’अंतर्गत शिवस्मारक समिती व ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित लोकनेते (स्व.) किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेच्या ४०व्या ज्ञानसत्राचा प्रारंभ गुरुवारी (ता. १६) सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. समारोप समारंभ रविवारी (ता. १९) सायंकाळी होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे कार्याध्यक्ष ॲड. बाळासाहेब लक्ष्मण बाणखेले यांनी दिली.
व्याख्यानमालेचे उद्‍घाटन गुरुवारी नगराध्यक्ष राजश्री गांजाळे, उपनगराध्यक्ष संदीप थोरात तसेच ज्येष्ठ नेत्या मथुराबाई किसनराव बाणखेले यांच्या हस्ते होणार आहे. व्याख्यानमालेत डॉ. सिद्धेश्वर वसंतराव हुंकिरे (लातूर), लेखक विश्वास पाटील, ॲड. वैशाली डोळस यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेतील कार्यक्रम डॉ. प्रशांत गाडे, डॉ. सचिन गाडे व डॉ. प्राची थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. रविवारी (ता. १९) रोजी सांगता समारंभात शिवशाहीर बाळासाहेब मालुसरे, लोकशाहीर बापू पवार व प्रा. श्रीरंग बोराडे यांच्या लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली आहे, अशी माहिती लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com