आंबेगावला विकास कामांसाठी एक कोटी ६० लाखांचा निधी

आंबेगावला विकास कामांसाठी 
एक कोटी ६० लाखांचा निधी
Published on: 

मंचर, ता. ३ : आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्ते, क्रीडांगण विकास, संरक्षक भिंती, पत्राशेड तसेच विविध सार्वजनिक सुविधांच्या कामांसाठी पुणे जिल्हा परिषद निधी सन २०२६-२७ अंतर्गत एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘पारगाव व जारकरवाडी येथे प्रत्येकी दहा लाख रुपये खर्चून क्रीडांगणांचा विकास करण्यात येणार आहे. पहाडदरा येथे जिल्हा परिषद शाळा ते वायकर निवास रस्त्याचे काँक्रिटीकरण (पाच लाख), धामणी मधलामळा रस्ता (दहा लाख), पोंदेवाडी नेवाळेवस्ती रस्ता (दहा लाख), रानमळा अंतर्गत रस्ते (सात लाख), वडगावपीर येथील मांदळेवाडी रोड ते तुकाराम आदक घर केटीवेअर रस्ता (दहा लाख) या कामांचा समावेश आहे.
वाळुंजनगर कानसकरवस्ती ते सविंदणे शिव रस्ता (दहा लाख), निरगुडसर बेलसरवाडी येथील नारळदेव-टेमकरमळा रस्ता (आठ लाख), जवळे येथील शिंगवे-भराडी रोड ते साईमंदिर-बोराटेवस्ती रस्ता (दहा लाख), लाखणगाव येथील राझोबा पाझरतलाव ते दौंडवस्ती रस्ता (दहा लाख) या कामांनाही निधी मंजूर झाला आहे.
पिंपळगाव येथे भक्ताचा मळा ते मधलामळा ग्राम १३५ रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्यासाठी ९.९९ लाख, पारगाव तर्फे खेड येथे ग्रामपंचायत परिसर सुधारण्यासाठी ९.९९ लाख, अवसरी बुद्रुक येथील नाना-नानी पार्कमध्ये डायनिंग हॉल व पत्राशेड बांधण्यासाठी ९.९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नानवडे हिलेवस्ती रस्ता काँक्रिटीकरण (दहा लाख), आमोंडी भैरवनाथवस्ती रस्ता काँक्रिटीकरण (पाच लाख), राजपूर पालखेवाडी येथे पत्राशेड बांधकाम (पाच लाख) आणि जांभोरी माचीचीवाडी येथे आखाडा बांधकामासाठी (दहा लाख) निधी मंजूर करण्यात आला आहे.

‘‘ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर कामे चांगल्या व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घ्यावीत. कामांच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनीही जागरूक राहावे.’’
-विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.