‘अटल भूजल’चा स्टॉल लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अटल भूजल’चा स्टॉल लक्षवेधी
‘अटल भूजल’चा स्टॉल लक्षवेधी

‘अटल भूजल’चा स्टॉल लक्षवेधी

sakal_logo
By

माळेगाव, ता. २० : लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाबाबत प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने बारामती कृषिक प्रदर्शनात उभारलेला अटल भूजल योजनेबाबतचा स्टॉल लक्षवेधी ठरत आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (महाराष्ट्र राज्य) आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या उपक्रमाला शेतकरी प्रतिसाद देत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्यासह तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामसमृद्धीची दिशा दाखविण्यासाठी भूजल व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गुरुवार (ता. १९) त्यांनी स्टॉलला भेट दिली असता वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे यांनी अटल भूजल योजनेबाबतची सद्यस्थितीबाबतची माहिती दिली.
यावेळी अटल भूजल योजनेचे माहितीपत्रक शासनस्तरावर वाटप करण्यात आले. यावेळी दीपक कुलकर्णी, अमित जाधव, दर्शन साठे, डॉ. विजय पाखमोडे, भाग्यश्री मग्गीरवार, डॉ. चंद्रकांत भोयर, डॉ. प्रमोद रेड्डी, सुजाता सावळे आदींसह विषय तज्ज्ञ उपस्थित होते.