भिलारवाडीतील ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू

भिलारवाडीतील ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू

माळेगाव, ता. २३ : भिलारवाडी (ता.बारामती) हद्दीतील पवारवस्ती-सायंबाचीवाडी रस्त्यावर मोटारसायकलस्वाराने सोमवारी (ता. ६) महादेव गजानन पवार (वय ७३) यांना जोरदार धडक दिली होती. त्यावेळी डोक्यास जबर मार लागून ते जखमी झाले होते. त्यांचा गुरुवारी (ता.२३) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी पवार यांचा मुलगा भरत यांनी गुरुवारी अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार वायसे पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com