माळेगाव साखर कारखाना देणार सभासदांना २०० रुपये कांडेपमेंट

माळेगाव साखर कारखाना देणार सभासदांना २०० रुपये कांडेपमेंट
Published on

माळेगाव, ता.४ : आगामी ऊस लागणींची कामे आणि शैक्षणिक वर्षातील वाढत्या खर्चाचा विचार करता माळेगाव साखर कारखाना प्रशासनाने मंगळवारी (ता. ४) सभसादांना प्रतिटन दोनशे रुपये एकरकमी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या कांडेपेमेंटसाठी कारखाना प्रशासनाने तातडीने सुमारे १७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कारखान्याने जाहीर केलेली रक्कम बुधवारी (ता.५) सभासदांच्या बॅंक खात्यावर वर्ग होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांनी दिली.
माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने यंदाचे शैक्षणिक वर्षे आणि आगामी ऊस लागण धोरण विचारात घेत सभासदांना प्रतिटन दोनशे रुपये कांडेपेमेंट दोण्याचे निश्चित केले होते. सुरवातीला हे पेमेंट दोन टप्प्यात देण्याचे धोरण होते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अनेक सभसादांनी सदरचे पेमेंट एकरकमी द्यावे, अशी मागणी केली होती. सदर मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून पवार यांनी रविवारी (ता. २) माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांना कांडेपेमेंट एकरकमी देण्याची सूचना केली होती. त्या सूचनेनुसार आज (मंगळवारी) अॅड. जगताप यांनी एकरकमी कांडेपेमेंट देण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी उपाध्यक्ष तानाजी देवकाते, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com