‘माळेगाव’चा दुसरा हप्ता प्रतिटन ३२५ रूपये जाहीर
माळेगाव, ता. ४ : माळेगाव सहकारी साखर कारखानेही चालू हंगामात उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ३३२ रुपये जाहीर केला.
माळेगाव (ता. बारामती) कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त पणदरे येथे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात गेल्या तीन हंगामात ऊस गाळप, उपपदार्थ प्रकल्पात विक्रम प्रस्थापित केल्याबाबत उपस्थित सभासदांनी संचालक मंडळाच्या कार्याचे अभिनंदन केले. तसेच, चालू गळीत हंगामापोटी या अगोदर जाहीर केलेल्या पहिला हप्ता प्रतिटन २८०० रुपयांमध्ये वाढ होण्याची मागणी केली. तोच धागा पकडत अध्यक्ष जगताप यांनी दुसरा हप्ता ३३२ रुपये जाहीर करून सभासदांची मागणी मान्य केली. ही रक्कम २० मार्च अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल व त्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा निधीची तरतूद केल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, संचालक योगेश जगताप, नितीन सातव, मदनराव देवकाते, विश्वास देवकाते, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप, अभय जगताप, संजय कोकरे, संदीप जगताप आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

