सांगवी येथे मुलींना २५० सायकलींचे मोफत वाटप

सांगवी येथे मुलींना २५० सायकलींचे मोफत वाटप
Published on

माळेगाव, ता. २८ : ‘‘शिक्षणामध्ये सामर्थ आहे. शिक्षणामुळे विशेषतः मुली महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात सामान्य कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. हे जरी खरे असले तरी समाजातील दानशूर लोकांनीही मुलींच्या शिक्षणाच्या चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी पुढे यावे. अर्थात तोच हेतू डोळ्यासमोर ठेवत सांगवीचे रहिवासी व मुंबईचे उद्योजक भारत रंगराव तावरे यांनी मुलींसाठी २५० सायकलींचे मोफत वाटप केले आहे,’’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत स्पष्ट केले.

सांगवी (ता. बारामती) येथील उद्योजक भारत ऊर्फ बापू रंगराव तावरे यांनी मोफत उपलब्ध करून दिलेल्या २५० सायकलींचे वाटप शुक्रवारी (ता. २८) अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सचिन पाटील, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, विश्‍वास देवकाते, अनिल तावरे, प्रकाश तावरे, किरण तावरे, योगेश जगताप, महेश तावरे, सुरेश तावरे, चंद्रकांत तावरे, सचिन सातव आदी उपस्थित होते. दरम्यान, पवार म्हणाले, ‘‘समाजात पैसा गडगंज्ज कमविणारे अनेकजण आहेत, परंतु त्या कमविलेल्या पैशातून समाजासाठी खर्च करण्याची त्यांची दानत नसते. परंतु भारत बापूंसारखे मोजके लोक जन्म गावाला विसरत नाहीत. गावाच्या विकास कामात योगदान देण्यासाठी धावून येतात. भारत बापूंनी व त्यांच्या परिवाराने याआगोदर १६ लाख रुपये खर्च करून सांगवीच्या हायस्कूलची रंगरंगोटी केली होती. त्यानंतर आता सांगवी व त्या परिसरातील १५ शाळांमध्ये मुलींना २५० सायकली मोफत उपलब्ध करून दिल्या. परिणामी मुलींचा आत्मविश्वास वाढला आहे.’’ तत्पूर्वी रोहन तावरे, सोहन तावरे यांनी आजवर आपल्या उद्योग व्यावसायात यशस्वीतेचा आलेख मांडला. तसेच या उद्योग क्षेत्रात महिलांनाही संधी दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com