

माळेगाव, ता.१० : ‘‘कारखाना क्षेत्रात २० हजार एकर इतकाच ऊस उपलब्ध होतो. शेजारच्या खासगी कारखान्यांचीही गाळप क्षमता दुप्पट झाली आहे, अशा प्रतिकूल स्थितीत माळेगावला सातत्याने गेटकेन उसावर आवलंबून रहावे लागते. ही समस्या वेळीच ओळखून माळेगावने उसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी एआय तंत्रज्ञान कार्यक्षेत्रात राबविण्याचा निर्धार केला आहे,’’ असे प्रतिपादन माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप केले आहे .
माळेगाव (ता. बारामती) येथे कारखान्याने कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके-बारामती) मदतीने शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी (ता.९) एआय तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला.
माळेगावच्या कार्यक्षेत्रात १५ टक्केपेक्षा कमी ठिबक सिंचन प्रणाली आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञान अधिक गतीने वापरणे शक्य होण्यासाठी प्रथम ठिबक प्रणाली बनविण्यासाठी काम करावे लागेल, असे केव्हीकेचे विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) डॉ. विवेक भोईटे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी म्याप मायक्रॉपचे संचालक डॉ. भूषण गोसावी, एआय तज्ज्ञ संतोष जाधव, ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी एआयमुळे ऊस उत्पादनात कशी क्रांती होणार आहे, याची माहिती चित्रफितीद्वारे दिली. माळेगावचे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी देवकाते, अनिल तावरे, मदनराव देवकाते, योगेश जगताप, तानाजी देवकाते, दत्तात्रेय येळे, मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, बन्सीलाल आटोळे, सागर जाधव, निशिगंध निकम, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.
साखर कारखाना प्रशासन साखर, वीज, इथेनॉल, खते निर्मितीमध्ये आजवर उजवे ठरले आहे. परिणामी या कारखान्याचे प्रशासन शेतकऱ्यांना राज्यात उच्चांकी ऊस दर देण्यात यशस्वी ठरले आहे. अर्थात प्रगतीची ही यशस्वी घौडदौड यापुढेही कायम राहण्यासाठी प्रशासनाने आत्तापासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
- अॅड.केशवराव जगताप, अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना
एआय तंत्रज्ञानाचे फायदे ...
१. ऊस लागवडीपूर्वीचे माती परीक्षण, उपग्रहाद्वारे मिळवलेला परीक्षण उपयुक्त ठरते
२. अहवाल यांचे एकत्रित विश्लेषणातून पायाभूत खत मात्रा (बेसल डोस) निश्चिती केली जाते.
३. एआय तंत्राने वाढवलेली २१ दिवसांची सशक्त व मुळांचा जारवा अधिक असलेली रोपे उपलब्ध केली जातात.
४. लागवडपूर्व ते तोडणीपर्यंत सातत्याने मातीतील ओलावा व पोषक घटकांची माहिती मोबाइलवर उपलब्ध होते.
५. सिंचन व खत व्यवस्थापन अचूक करता येते.
६. दीड महिन्यापासूनच्या फुटव्यांची संख्या, कांडीची लांबी, संख्या, साची उंचीत दुपटीने वाढ होते.
७. योग्य वेळी तोडणीमुळे उत्पादन वाढीसोबतच साखरेचे प्रमाणही कळते.
02657
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.